भारतीय संस्कृती व गर्भपात (पूर्वार्ध)
भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान अत्यन्त गौण मानले जाते. स्त्रियांना देवतेसमान मानले जाते हे नुसते काव्य— -कदाचित ढोंगच—-स्त्रीच्या गौण स्थानाचा गवगवा 1975 सालच्या सुमारास विशेष झाला. त्याला कारण त्यावेळी स्त्रीच्या गौण स्थानामुळे लोकसंख्येचा प्र न सुटण्यामध्ये अनेक अडथळे येत असल्याची तीव्र जाणीव झाली वरच्या वर्गातील मूठभर स्त्रियांनी सभा भरविल्या, लेख लिहिले, आंतरराष्ट्रीय सभांमधून या जाणिवेचा जयघोष …